एग्रीकल्चर आणि सॅटर्डे क्लब

August 23, 2024

नमस्कार मित्रांनो
आपला सॅटर्डे क्लब 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे या पंचवीस वर्षाच्या प्रवासात आपण अनेक अनेक विक्रम प्रस्थापित केले आहे मग रिजन वाईज चॅप्टर बनवण्याची असेल, जास्तीत जास्त दणडील देण्याचे असेल किंवा महिला उद्योजिका सदस्य बनण्याचा असेल. या सर्व प्रवासात आपण सदस्यांचे  व्यवसाय वृद्धीसाठी सेल ची रचना केली आणि या माध्यमातून अनेक सदस्यांचा व्यवसाय खूप पटीने वाढला देखील. मित्रांनो आपण सर्वजण जाणता की भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि त्यात महाराष्ट्र हा कृषी क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करण्यात नेहमीच अग्रेसर असतो. तर मग वेगळे विक्रम प्रस्थापित करणारा आपला सॅटर्डे क्लब आता कृषीक्षेत्रात  आपले भरीव योगदान करायला पुढे येत आहे. आजपर्यंत आपण शेतीकडे राजकीय किंवा सामाजिक दृष्टिकोनानेच बघत आहोत. संपूर्ण देशभरात आज शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत त्याचबरोबर आज विषमुक्त अन्न हे फक्त भारताचे नाही तर संपूर्ण जगाची गरज बनली आहे त्यामुळे आज ज्याला आपण सेंद्रिय शेती किंवा ऑरगॅनिक शेती म्हणतो याचे दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे या क्षेत्रात देखील जर नीट प्लॅनिंग केले तर आर्थिक दृष्ट्या फायद्याची शेती होऊ शकते. आज आपले अनेक सदस्य हे ऑरगॅनिक प्रोडक्ट विकत आहेत त्याचबरोबर देशी गाईंचे संगोपन व दूध लोणी तूप याची देखील मागणी वाढत आहे. आज एम एम आर डी रिजन मध्ये आपले चार सदस्य ए टू गाईपासून चे पदार्थ विकत आहेत. पण पण असे असूनही गेल्या 75 वर्षात आपली शेती या विषयातील स्थिती फार काही चांगली आहे असं म्हणता येणार नाही आणि त्यामुळेच जर बदल करायचा असेल तर आपल्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे आणि म्हणूनच सॅटर्डे क्लब ज्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांसाठी मदत म्हणून उभा आहे त्याचप्रमाणे शेतीला देखील व्यवसायिक दृष्टिकोनातून बघावे आणि त्यातून अनेक यशस्वी शेतकरी तयार करावे हे या सेलचे उद्दिष्ट आहे. चार महिन्यांपूर्वी या सेलची घोषणा झाली आणि आपल्याला कळवण्यात आनंद वाटतो की आतापर्यंत पाच लाखापेक्षा दणडील झालेली आहे. आपण रिजन वाईज वेगळ्या कार्यक्रमाची योजना करत आहोत आणि मला सांगण्यासाठी अत्यंत आनंद वाटतो की की आपले अनेक सदस्य, एलाईट मेंबर देखील आपल्याला मदत करण्यास पुढे येत आहेत. या सेलमध्ये फक्त जमिनीवरची शेती नाही तर इतर अनेक अनेक वर्टीकल यात आहेत याचा तपशील आपापल्या रीजन कॉर्डीनेटर कडून आपल्याला मिळेलच.

या सेलच्या माध्यमातून वेगवेगळे शेतीतज्ञ यांना आपण आपल्या प्लॅटफॉर्म वरती आणून सॅटर्डे क्लब ची शेती बद्दलची काय भूमिका आहे हे आपण सर्वांसमोर आणणार आहोत.
मला पूर्णपणे कल्पना आहे की हे जेवढ्या सोप्या पद्धतीने लिहिले आहे तेवढेच कठीण काम आहे पण आपल्या सर्वांची साथ असेल तर या सेलच्या माध्यमातून अजून एक नवीन विक्रम आपण प्रस्थापित करू शकतो.

महादेव ठाकूर
अंधेरी पार्ले चॅप्टर
एग्रीकल्चर हेड

Leave a Comment